समाजसेवक आणि राष्ट्रीय नायक- अभिनेता सोनू सूद आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसाचं औचित्य साधून त्याने त्याच्या सोशल मीडियावर बहुप्रतिक्षित चित्रपट 'फतेह' च्या रिलीजच्या तारखेची घोषणा केली आहे. हा चित्रपट जो एक सायबर क्राइम थ्रिलर असणार आहे. या सिनेमातून सोनू सूद दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. नवीन पोस्टर आणि काही खास BTS फोटो पोस्ट करून ही घोषणा करण्यात आली आहे. फतेह 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटाविषयीची उत्सुकता नक्कीच वाढवली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना सूद यांनी या बद्दल ची उत्सुकता व्यक्त केली आहे.

सूदने पोस्ट टाकताच त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देऊन कौतुकाचा वर्षाव केला. तो म्हणाला की ही कथा "महत्त्वपूर्ण" आहे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे. शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित, 'फतेह' मध्ये सूद नसीरुद्दीन शाह आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

सोनू सूदचे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणारा ‘फतेह’ सायबर क्राइमच्या वास्तविक जीवनातील घटनां वर आधारित असून झी स्टुडिओज आणि शक्ती सागर प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली हा चित्रपट भारतीय कलाकारांना त्याच्या ॲक्शन सीक्वेन्ससह पर्वणी देणार आहे.